एक्झिट पोल काहीही आला तरी गुलाल आम्हीच उधळणार; कसबा पोटनिवडणुकीतील ‘या’ उमेदवाराला विश्वास
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल आहे. या निकालाआधी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मजमोजणीला सुरुवात होईल. निकालाआधी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. “एक्झिट पोल काहीही आला, तरी विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलंय त्यावर आम्हाला विश्वास आहे. लोकांनी विकासाला मतं दिलं असेल. त्यामुळे जिंकणार तर आम्हीच, या विजयाची आम्हाला खात्री आहे”, असं रासने म्हणालेत. “आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की बॅनर लावायची घाई करू नका. 2 तारखेनंतर लावलेले बॅनर कायम राहतील”, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी दिली.
Published on: Mar 01, 2023 01:49 PM