भाजपने महाविकास आघाडी शिवसेनेवर लादली, संजय राऊतांचा पलटवार
मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं शिवसेनेचा मुख्यमंत्री करू शकतो. असं सांगणारे आणि या प्रयोगाचं स्वागत करणारे सगळेच होते, असंही संजय राऊत म्हणाले.
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर सांगितलं की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रत्येक गोष्टी सहकाऱ्यांना सांगत असतात. महाविकास आघाडी आपण कोणत्या परिस्थितीत करतोय. भाजपनं आपल्यावर ही वेळ आणली आहे. म्हणून आपण महाविकास आघाडीच्या दिशेनं निघालो आहोत. हेसुद्धा आम्हाला उद्धव ठाकरे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं. तेव्हा या सगळ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं. महाविकास आघाडीशी युती ही भारतीय जनता पक्षाला धडा शिकविण्याची संधी आहे. कारण भाजपनं आपला शब्द पाळला नाही. ठाकरेंच्या शब्दांचा अपमान केला. मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं शिवसेनेचा मुख्यमंत्री करू शकतो. असं सांगणारे आणि या प्रयोगाचं स्वागत करणारे सगळेच होते, असंही संजय राऊत म्हणाले.
Published on: Jul 19, 2022 08:02 PM