Special Report | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

Special Report | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

| Updated on: Apr 23, 2022 | 10:59 PM

मातोश्रीत घुसण्याची हिम्मत नाही, बदनामी करतायत. मग शिवसैनीक चिडून तुमच्या घरांपर्यंत शिरण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला धमक्या देऊ नका, राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय संस्था येतील, हिम्मत असेल तर लावा आम्ही घाबरत नाही, असे राऊत म्हणाले.

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला आणि राणा दाम्पत्याला अटक यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी भाजपने केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाच्या तरी पाठबळाने तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनीक शांत बसणार का? कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबी आम्हाला सांगू नका. कायदा आणि सुव्यवस्थे बाबात उपयोजन करण्यासाठी तुमचे सल्ले ऐकण्याइतकं महाराष्ट्राला भिकारीपण आलं नाही. मातोश्रीत घुसण्याची हिम्मत नाही, बदनामी करतायत. मग शिवसैनीक चिडून तुमच्या घरांपर्यंत शिरण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला धमक्या देऊ नका, राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय संस्था येतील, हिम्मत असेल तर लावा आम्ही घाबरत नाही, असे राऊत म्हणाले.

Shivsena VS Rana Couple : राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल
Special Report | 5 विरोधकांचा मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना चौफेर घेराव