कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही म्हणाले होते, पण आता कुठेत?; किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांना डिवचलं…
भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोताना त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. पाहा...
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झालेत.यावेळी बोलताना त्यांनी हसन मुश्रीफ यांना डिवचलं आहे. “हसन मुश्रीफ यांनी प्रतिज्ञा घेतली होते की, किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही. मात्र आता त्यांचे पाय कुठे कुठे घसरले आहेत हे दिसत आहे, असं सोमय्या म्हणालेत. हसन मुश्रीफ यांना आता लक्षात आलं आहे की, गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमय्या जीवाचीही काळजी करणार नाहीत, असं ते म्हणालेत
Published on: Feb 23, 2023 09:44 AM