काँग्रेसला धक्का, आणखी एक बडा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला?

| Updated on: Jan 21, 2023 | 12:16 PM

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सत्यजित तांबे यांना आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर आता भाजपने विधानसभेसाठीही काँग्रेसच्या एका नेत्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

पुणे : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक ( MLA MUKTA TILAK ) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २७ फेब्रवारीला निवडणूक होत आहे. ही निवडणूक लढविण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP ) केली आहे. राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील-ठोंबरे ( RUPALI THOMBARE ) यांनी पक्षाने आदेश दिल्यास कसबा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास तयार आहे असे सांगितले आहे.

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत रंगण्याची शक्यता आहे. तर ही जागा आपल्याकडे कायम राखण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली असून काँग्रेसचा नेत्यांना आपल्याकडे वळविण्यास सुरवात केली आहे.

पुण्यातील सहकार नगर येथे आपल्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले असता तेथे त्यांची कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांनी भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली त्याचा तपशील गुलदस्त्यात असला तरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

Published on: Jan 21, 2023 12:16 PM
पुणे टॉप न्यूज, विद्यापीठात जाताना नोंदणी करावी लागणार
MHADA Lottery : मुंबईकरांना घराची लॉटरी लागणार? पण कधी? घ्या जाणून