Anil Bonde | ‘नाहीतर आपलेच लोक आपला पराभव करतात’
आपला एक उमेदवार पडला असता तर संजय राऊत काय बोलले असते हा विचार करा. विजय करायचा असेल तर आपल्यामधील आपण काय आहे विसरायच. युद्ध जिंकायला चांगला नेता पाहिजे, चांगला झेंडा पाहिजे, असेही बोंडे यांनी नमूद केले.
अमरावती : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांची जबाबदारी पक्षाने घेतली आहे. आम्हाला शेवटपर्यंत माहीत नव्हतं कोणाला किती मतांचा कोटा मिळाला. आता जिल्ह्यात युती कोणाशी नाही. स्वबळावर निवडणुका लढुया. स्वतःचा अहंकार सोडून मी कोण आहे हे विसरुन पक्षासाठी काम करा. नाहीतर आपलेच लोक आपला पराभव करतात, असा सल्ला अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. आपला एक उमेदवार पडला असता तर संजय राऊत काय बोलले असते हा विचार करा. विजय करायचा असेल तर आपल्यामधील आपण काय आहे विसरायच. युद्ध जिंकायला चांगला नेता पाहिजे, चांगला झेंडा पाहिजे, असेही बोंडे यांनी नमूद केले.
Published on: Jun 13, 2022 01:13 AM