‘मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस…,’आशीष देशमुख यांची टीका

| Updated on: Feb 26, 2024 | 12:47 PM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ग्रामीण शैलीत जोरदार टीका केली आहे. आपल्याला भाडोत्री माणसांद्वारे बदनाम करण्यामागे फडणवीस यांचे कारस्थान आहे. फडणवीस आपला एन्काऊंटर करतील, सलाईनमधून विष देतील किंवा उपोषणात मारून टाकतील असा सनसनाटी आरोप जरांगे यांनी केला होता. आता भाजपाचे नेते आशीष देशमुख यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

नागपूर | 26 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. आपल्या संपविण्याचा देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यानंतर ते सागर बंगल्याकडे रात्री निघायला निघाले होते. त्यानंतर त्यानंतर ते पुन्हा माघारी फिरले. आता या प्रकरणात भाजपाचे नेते आशीष देशमुख यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ते बालबुद्धी आहेत. आपण गेले पाच सहा महिने त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सांगत होतो. आता तर त्यांचा मास्टरमाईंड संपूर्ण राज्याला कळला आहे. ते राजकीय व्यक्ती आहेत. त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. आता निवडणूक जवळ आल्याने त्यांच्यातील राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली आहे. महाराष्ट्राचे जनता बालबुद्धी, अपरिपक्व आणि घिसाडघाई करणारे नेतृत्व कदापि स्विकारणार नाही. त्यांचा एकदिवस गुजरातच्या हार्दिक पटेल होईल अशी टीका आशीष देशमुख यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रगत आणि सुसंस्कृत राज्य आहे. फडणवीस यांच्या सारख्या नेत्यावर अशी हीन टीका मराठा समाज, महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 26, 2024 12:46 PM
WITT Global Summit : ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’मध्ये Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT Global Summit : मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर का भडकल्या? बघा कसं झापलं?