Chandrakant Patil | अजित पवार, अनिल परबांची CBI चौकशी झाली पाहिजे : चंद्रकांत पाटील
आमचे जितके कार्यकर्ते आहेत आम्ही जबाबदारीने ठराव केला आहे. सीबीआय चौकशीबाबत अमित शाह यांना पत्र लिहिलंय.
मुंबई : प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत आम्ही ठराव मांडला होता. पदाचा उपयोग करून पैसा जनरेट करण्याचा प्रयत्न आहे. वाझे हे देखील सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या आरोपाबाबत अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी होण्याची मागणी केली आहे. आमचे जितके कार्यकर्ते आहेत आम्ही जबाबदारीने ठराव केला आहे. सीबीआय चौकशीबाबत अमित शाह यांना पत्र लिहिलंय. अनिल देशमुख त्या वेळेस जे म्हणत होते की कोणतं तेल लावले आहे आता मी त्यांना पूर्ण बाटलीच पाठवून देतो.