Video : बोलवाल तिथं चौकशीसाठी यायची माझी तयारी, माझा आवाज तुम्ही बंद करु शकत नाही- चित्रा वाघ
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालंय. या प्रकरणातील पीडित तरुणीने आता थेच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात तसंच मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं. पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास वाघ यांनीच सांगितल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केलाय. त्यामुळे या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलंच […]
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालंय. या प्रकरणातील पीडित तरुणीने आता थेच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात तसंच मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं. पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास वाघ यांनीच सांगितल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केलाय. त्यामुळे या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केलीय. तर चित्रा वाघ यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिलीय. ‘फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं. आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला’, असं वाघ यांनी म्हटलंय. जिथं बोलवाल तिथं चौकशीसाठी यायची माझी तयारी आहे, माझा आवाज तुम्ही बंद करु शकत नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.