राऊत यांच्यावर कोणाची खरमरीत टीका? म्हणाल्या, ‘सर्वज्ञानी कंपाऊंडरला विश्रांतीची गरज’
केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळले जाळण्याचा प्रयत्न झाला. तर लाखो लोक पलायन करत आहेत. मात्र सरकारकडून कारवाई होत नाही. सरकारला हवे तरी काय? मणिपूरला काश्मीर बनवायचे आहे का? असं सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केला.
मुंबई : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. येथे केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळले जाळण्याचा प्रयत्न झाला. तर लाखो लोक पलायन करत आहेत. मात्र सरकारकडून कारवाई होत नाही. सरकारला हवे तरी काय? मणिपूरला काश्मीर बनवायचे आहे का? असं सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केला. तसेच हे सर्व केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. तर अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत असा सवाल केला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पलटवार केला. त्यांनी राऊत हे 103 दिवस जेलमध्ये राहून आलेत त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तर त्यांना काविळ झाल्यागत सगळ पिवळ दिसत आहे. त्यामुळे ते असे बोलत आहेत. यामुळे आता सर्वज्ञानी कंपाऊंडर विश्रांतीची गरज असल्याचा टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.
Published on: Jun 17, 2023 04:20 PM