शिवरायांचा वारसा असलेला हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन

| Updated on: Nov 16, 2024 | 6:09 PM

भाजपाच्या फायर ब्रॅंड नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार तोफ डागत तिला नराधम असा शब्द प्रयोग वापरला आहे.या नरामधमांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता देऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे. एका मुस्लीम धर्मगुरुने महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने चित्रा वाघ यांनी हे वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडी सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते असा आरोप भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलेला आहे. मुस्लिम धर्मगुरू मौलाना खलील उररहमान सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने हा व्होट जिहाद असल्याचा आरोप भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. या नंतर चित्रा वाघ यांनी नोमानी यांच्या सतरा मागण्यांना पूर्ण करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिलेले आहे त्यामुळे हा पाठींबा जाहीर करण्यात आला आहे असा आरोप चित्रा वाघ यांनी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेला हा महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या या नराधमांच्या हातात देऊ नका असे आवाहन चित्रा वाघ यांनी केलेले आहे. यांनी आपला सौदा केलेला आहे. आणि व्होट जिहादच्या माध्यमातून हे कसे काम करीत आहेत हे आपल्या समोर येत असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

 

Published on: Nov 16, 2024 06:08 PM
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
विधानसभेचा प्रचार तापला, ‘व्होट जिहाद’ला ‘धर्मयुद्धा’नं उत्तर, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार