चित्रा वाघ यांनी केलं उर्फी जावेद हिचं स्वागत, वादावर पडदा की आणखी काही?
औरंगाबाद : भाजप नेत्या चित्रा वाघ ( CHITRA WAGH ) यांनी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या दौरा पूर्ण केला. त्यांच्या दौऱ्याची आज औरंगाबाद येथे सांगता झाली. आपला दौरा सुरु असतानाही त्यांनी उर्फी जावेद प्रकरण लावून धरले. उर्फी जावेद प्रकरणावरून आज औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद ( URFI […]
औरंगाबाद : भाजप नेत्या चित्रा वाघ ( CHITRA WAGH ) यांनी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या दौरा पूर्ण केला. त्यांच्या दौऱ्याची आज औरंगाबाद येथे सांगता झाली. आपला दौरा सुरु असतानाही त्यांनी उर्फी जावेद प्रकरण लावून धरले.
उर्फी जावेद प्रकरणावरून आज औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद ( URFI JAVED ) हिच्यात जे काही कुटून भरलेले कलागुण आहेत ते तिने तिकडे दाखवावे. रस्त्यावर दाखवू नये हा आमचा आक्षेप आहे. असा स्वैराचार महाराष्ट्रात चालणार नाही. समाज स्वास्थासाठी जे धोकादायक वाटते ते मी पोलिसांच्या नजरेत आणून दिले. माझे काम आहे ते मी केले आहे, असे त्या म्हणाल्या.
हा लढा सुरु झाल्यावर आता दोन दिवस काही लोकांनी मला तिचे पूर्ण कपडे घातलेले फोटो पाठवले. त्यावर आक्षेप घेण्याचे काम नाही. पण जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. दोन दिवस ती पूर्ण कपडे घालून दिसली, त्याचे स्वागत आहे. अगर कोई सुधर गया है तो… चान्स देना चाहिये असेही चित्रा वाघ म्हणाल्या.