इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांनी लिहीले फडणवीसांना पत्र

| Updated on: Mar 04, 2024 | 3:31 PM

इंदापूर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणूकांच्या निमित्ताने महायुतीतील दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मित्रपक्षांकडून इंदापूरात फिरु नको अशी धमकी मिळाल्याची तक्रार देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. मागे जो आपल्या विधानसभेत मदत करेल त्यालाच लोकसभेत मदत करु असा नारा हर्षवर्धन यांची कन्या आणि पूत्राने दिला होता.

इंदापूर | 4 मार्च 2024 : भाजपात गेल्याने आपल्याला शांत झोप लागते असे विधान करुन चर्चेत आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या इंदापूरात फिरु नको म्हणून धमकी मिळाली असल्याची तक्रार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. भाजपाचे मित्रपक्षच आपल्या शिवीगाळ करीत असल्याचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. हे अत्यंत धक्कादायक असून यात तात्काळ लक्ष घालावे असे पत्रच हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले आहे. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता आणि पूत्र राजवर्धन यांनी विधानसभेला जो आम्हाला मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेत मदत करू अशी भाषा केली होती. अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे सध्याचे आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाचे हर्षवर्धन यांची इंदापूर विधानसभेसाठी हातघाई सुरु आहे. त्यातूनच आता भाजपाचे मित्रपक्ष आपल्याला धमकी देत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटल्याची चर्चा आहे. भाजपात येऊन आता त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची झोप उडाली आहे.

Published on: Mar 04, 2024 03:29 PM
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील