मोठ्या शक्तीप्रदर्शनानंतर हेमंत रासनेंचा उमेदवारी अर्ज दाखल; पाहा…
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पाहा व्हीडिओ...
मोठ्या शक्ती प्रदर्शनानंतर हेमंत रासने यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी भाजपने मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे पुण्यातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेली बोलताना हेमंत रासने यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तर चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन विरोधीपक्षाला केलं आहे.
Published on: Feb 06, 2023 11:48 AM