‘शरद पवार यांचीही अवस्था आता उद्धव ठाकरे यांच्यासारखी होणार?’ भाजप नेत्याची बोचरी टीका
राजकारणात कोणती गोष्ट कधी होईल काही सांगता येत नाही. त्याचं आम्हालाही कधी कधी काहीच कळत नाही. शिवसेना कुठल्या कूठ गेली.
मुंबई : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत अजित पवार यांनी काल शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला. तर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला. त्यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. यावरून भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीची परिस्थिती आता ठाकरे गटासारखीच होणार असल्याचे म्हटलं आहे. तर शरद पवार यांचीही अवस्था आता उद्धव ठाकरे यांच्यासारखी होणार असा दावा केला आहे. राजकारणात कोणती गोष्ट कधी होईल काही सांगता येत नाही. त्याचं आम्हालाही कधी कधी काहीच कळत नाही. शिवसेना कुठल्या कूठ गेली. आता राष्ट्रवादीचीही तिच गत आहे, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 03, 2023 09:05 AM