Atul Bhatkhalkar | ‘भ्रष्टाचाराच्या पैशांनी मातोश्री भरलीय’; भातखळकरांचा ठाकरेंवर घाणाघात-tv9

| Updated on: Aug 23, 2022 | 11:30 AM

भातखळकर म्हणाले, मागच्या वेळीच भाजप त्यांच्या विरोधात लढली त्याचवेळी त्यांच्या नाकात तोंडात पाणी गेले होते. त्यावेळी हिंदूत्वाच्या मुद्दावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर बसू दिला.

भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका आहे. यावेळी भातखळकर यांनी टीका करताना, उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या पैशांनी मातोश्री भरली आहे. त्यांचा आता घडा भरला आहे आणि तो आता भाजपच फोडणार असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर भातखळकर म्हणाले, मागच्या वेळीच भाजप त्यांच्या विरोधात लढली त्याचवेळी त्यांच्या नाकात तोंडात पाणी गेले होते. त्यावेळी हिंदूत्वाच्या मुद्दावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर बसू दिला. मात्र यावेळी 110% आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकणार. तर आता त्याचं उत्तर तुम्हाला जनताच दिल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं असे भातखळकर म्हणाले.

 

 

 

Published on: Aug 23, 2022 11:30 AM
Shiv Sena : लवकरात लवकर सुनावणी घ्या, शिवसेनेची महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात याचिका
Cabinate Expansion | एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद महिलांना देणार-tv9