प्रफुल्ल पटेल यांच्या त्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकर याचं प्रत्युत्तर म्हणाले, ‘दुसऱ्या कोणाचं काय मत…’
तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी, मंत्री धर्मरावबाबा अत्राम आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत असे बोलून दाखवलं होतं.
मुंबई, 27 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यापासून ते मुख्यमंत्री होतील अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात होत आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली आहे. तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी, मंत्री धर्मरावबाबा अत्राम आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत असे बोलून दाखवलं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावरून मोठं वक्तव्य केलं आहे. पटेल यांनी, अजित पवार हे आज नाही तर उद्या मुख्यमंत्री होती. काम करणाऱ्याला संधी मिळतेच त्यांनाही मिळेल असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट पटेल यांच्यावर टीका करताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर कोण काय बोलतो याला महत्व नसल्याचे म्हटलं आहे. तर याबाबत युतीतील लोकांनी वक्तव्य करू नये असे देखील त्यांनी म्हटलं आहे.