मुख्यमंत्री झाल्यावर स्वत: च्या घरच्या बांधावर तरी गेले का? प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

| Updated on: Mar 08, 2023 | 2:41 PM

भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी विरोधकांचा आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला

मुंबई : मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिढीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यावर अधिवेशनात घमासान सुरू आहे. सरकार आणि विरोधकांच्यात यावरून टीका होत आहे. याचमुद्द्यावर भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी विरोधकांचा आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी ज्या शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान झालं आहे. त्याचे आपल्याला दुख असल्याचे म्हटलं आहे. याचवेळी जे सरकारवर टीका करतात त्यांच्यावर प्रतिक्रिया देताना, हे सरकार संवेदशिल आहे. मात्र उद्धव ठाकरे विरोधात असताना बांधावर गेले, शेतकऱ्यांना भरपाई देऊ म्हणाले. तेच उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते शेतकऱ्यांच्या बांदावर गेले का? इतकच काय तर ते मुख्यमंत्री झाल्यावर स्वत: च्या घरच्या बांधावर तरी गेले का? त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमच्या सरकारला शहाणपण शिकवू नये, असा टोला लगावला आहे.

Published on: Mar 08, 2023 02:39 PM
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके अडचणीत, गुन्हा दाखल
महिला दिनानिमित्त राज ठाकरे यांची महिलांना साद, शुभेच्छा देत दिली मोठी ऑफर