Mohit Kamboj Tweet | ‘आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के’-tv9

| Updated on: Aug 17, 2022 | 11:11 AM

लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्याकडे जाणार आहे. तेथे पाचवी जागा रिकामी आहे. आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के असतो असेही कंबोज यांनी लिहिले आहे.

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन आता काही वेळातच सुरू होणार आहे. या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत विरोधी पक्ष असतानाच आता भाजप नेते मोहित कंबोज यांचे ट्विट युद्ध रंगले आहे. कंबोज यांनी एकापाठोपाठ ट्विट करत महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. ‘हर हर महादेव अब तांडव होगा’ असे त्यांनी ट्विटरवर त्यांनी लिहिलं आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्याकडे जाणार आहे. तेथे पाचवी जागा रिकामी आहे. आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के असतो असेही कंबोज यांनी लिहिले आहे. तसेच हे ट्विट सेव्ह करा असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्र सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे संकेत कंबोज यांनी दिले आहेत.

Published on: Aug 17, 2022 11:11 AM
Video: नागपुरातील कन्हान नदीला पूर, पाहा व्हीडिओ…
Nana Patole | ‘ईडी सरकारची उलटी गिनती सुरु’-नाना पटोले-tv9