‘यांना कानाखाली नाही मारायची मग काय पुजा करायची ?’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे आक्रमक

| Updated on: Sep 22, 2022 | 8:26 AM

बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. मात्र त्यांच्या एका वक्तव्यावरून नितेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई :  बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मात्र यावेळी बोलत असताना त्यांनी एक मे शिवजयंती असा उल्लेख केला होता. यावरून भाजप नेते नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंचा हा व्हिडीओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.  तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधाला आहे. बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची खुर्ची खाली होती. यावरून संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘उद्या तुमचीही खुर्ची खाली असेल तयारी ठेवा’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

 

 

Published on: Sep 22, 2022 08:26 AM
‘गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही, पण….’ सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीसांवर घणाघात
दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला बसणार आणखी एक धक्का; शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर?