‘जरांगे आम्ही पण मराठा आहोत, फडणवीस यांच्यापर्यंत पोहचण्याआधी….,’ काय म्हणाले नितेश राणे

| Updated on: Feb 25, 2024 | 5:07 PM

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या सर्व आरोप करणाऱ्यांना सरकारचे पाठबळ असून देवेंद्र फडणवीस आपला बळी घ्यायला उठलेत असा खळबळजनक आरोप केला. जरांगे यांनी सागर बंगल्यावर आपण येत आहोत. बळी घ्यायचा तर माझा घ्या पण मराठ्यांना आरक्षण द्या असे आव्हान देत मुंबईकडे कूच केली आहे. यावर भाजपा नेते नितेश राणे यांनी जरांगेंना इशारा दिला आहे.

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी आरोप केल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारवर प्रचंड टीका केली आहे. या सर्व षडयंत्रामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही माणसे तसेत अजित पवार यांचे तीन आमदार यात सहभागी असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. फडणवीस यांना आपल्याला संपवायचे आहे, ते आपल्या सलाईनमध्ये विष घालतील म्हणून मी सलाईन पण बंद केली आहे. ते आपला एन्काऊंटर देखील करतील असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. तुम्हाला नेमके काय हवे आहे, मराठा समाजाला आरक्षण मागताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून तुम्ही राजकारण सुरु केले आहे. सगेसोयरेचा अध्यादेश सरकार आज ना उद्या करेलच. परंतू आम्ही देखील मराठा आहोत. आमच्या नेत्यांपर्यंत पोहचण्याआधी तुम्हाला आमची भिंत पार करावी लागेल असा इशारा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी दिला आहे.

Published on: Feb 25, 2024 05:06 PM
What India Thinks Today LIVE: नवी दिल्लीतून ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉन्क्लेव्हची आजपासून दमदार सुरूवात
WITT Global Summit : ब्रॅड इंडिया आर्थिक क्षेत्रात कसा मजबूत होणार? बरूण दास यांनी मांडली भूमिका