‘जोपर्यंत मराठा आरक्षण नाही, तोपर्यंत फेटा….’, पंकजा मुंडे यांचा मोठा निर्धार
त्यांनी आपण फेटा बांधणार नाही असं म्हणताना आता ताकही फुकूंन पिण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. ज्यामुळे पंकजा मुंडे असे का म्हणाल्या अशीच चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये आयोजित कार्यकर्मात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हे वक्तव्य केलं आहे.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे गेल्या काही दिवसांपासून वक्तव्य फार चर्चेत आली आहेत. आताही त्यांचे एक वक्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी त्यांनी आपण फेटा बांधणार नाही असं म्हणताना आता ताकही फुकूंन पिण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. ज्यामुळे पंकजा मुंडे असे का म्हणाल्या अशीच चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये आयोजित कार्यकर्मात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हे वक्तव्य करताना जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असा निर्धार केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांचे नाव घेत त्यांनी मला फेटा बांधा असं म्हणाले. मात्र यावेळी ओबीसी आरक्षणाची आठवण करून देताना, त्यावेळी मी गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही, असं म्हटलं होतं. तेंव्हा ओबीसी आरक्षण वाचलं आणि लोकांनी गळ्यात हार घातले. पण आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. यावेळी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.