Ravindra Chavan | हे सरकार महाराष्ट्राचे हित जपणारे, येत्या काळात गतिमान कारभार हाकेल , भाजप नेते रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 09, 2022 | 5:29 PM

Ravindra Chavan | हे सरकार महाराष्ट्राचे हित जपणारे असून येत्या काळात गतिमान कारभार हाकेल असा विश्वास भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

Ravindra Chavan | हे सरकार (New Government) महाराष्ट्राचे हित जपणारे असून येत्या काळात गतिमान कारभार हाकेल असा विश्वास भाजप नेते रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी व्यक्त केला. शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्तांतर घडून आणले. गेल्या एक महिन्यांच्यावर या सरकारने महाराष्टाचा गाडा हाकला. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) सातत्याने हे सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकाकडून (Opposition) होऊ लागला. तसेच फुटलेले सर्वच आमदार मंत्रीपद मागत असल्यानेच मंत्रीमंडळाला मुहुर्त लागत नसल्याचा आरोप होत होता. अखेर या सर्व घडामोडीवर आज मंगळवारी, 9 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारातून पडदा पडला. शिंदे गटात माणसे खेचून आणण्यात आणि संपर्क करण्यात भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी मोलाची भूमिका निभावल्याचे बोलले जात होते. त्याचेच हे बक्षिस असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ही कामाची पावती असल्याचे सांगत चव्हाण यांनी अधिक बोलायचं टाळलं.

Published on: Aug 09, 2022 05:29 PM
Nana Patole | महाराष्ट्राचं सरकार गुजरातसाठी तयार केलं का? नाना पटोले यांचा खोचक सवाल
Priyanka Chaturvedi | असंवैधानिक मंत्र्यांची शपथ थोड्याच दिवसांची, प्रियंका चतुर्वेदी यांची टीका