भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले

| Updated on: Nov 09, 2024 | 4:20 PM

एकीकडे निवडणूकांचा प्रचार सुरु असताना सांगलीत भाजपाच्या एका राजकीय नेत्याची दिवसाढवळ्या कुऱ्हाडीने वार करुन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. सुधाकर खाडे असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव असून ते सध्या भाजपाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते.

राज्यात निवडणूकीची धामधूम सुरु असताना सांगली जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर रस्त्यावर भाजपाचे नेते सुधाकर खाडे यांची ( Sudhakar Khade Murder ) हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खाडे आधी मनसेचे माजी जिल्हाप्रमुख होते. सध्या ते भाजपाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांची अशा प्रकारे कुऱ्हाडीचे वार करुन हत्या झाल्याने सांगलीत खळबळ उडाली आहे. सुधाकर खाडे भाजपाच्या स्टार्टअप्स इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. साल 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. पंढरपूर रोडवरील राममंदिर जवळी एका जागेवरुन खाडे यांचा एका व्यक्तिसोबत वाद झाला होता. त्यातून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. हल्ल्यानंतर एका खाजगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. परंतू डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले आहे. या प्रकरणी एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस तपास करीत आहेत.

 

Published on: Nov 09, 2024 03:30 PM
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
जेवढे मोदी – शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा, जयंत पाटील यांचा दावा