आता पुतळे जाळणारे, ‘राज्यपाल, त्रिवेदी बोलले तेव्हा कुठे होते?’: अमोल मिटकरी
महाजन यांच्या मागणी आणि टीकेवर मिटकरी यांनी उत्तर देताना, आधी संभाजीराजे यांचा इतिहास वाचा. ते स्वराज्य रक्षक होते आणि राहतील. त्यांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून वाद सुरू आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते,’ असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपसह अनेक संघटनांनी आंदोलने केली. तसेच अजित पवार यांचे पुतळेही जाळले आहेत. यावरूनच भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांनी टीका केली आहे. तर त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाजन यांनी, अजित पवार यांनी संभाजीराज्यांच्या बाबतीत अतिशय आक्षेपार्ह आणि चुकीचं बोलल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर जो इतिहास आहे तो ही बदलू पाहत आहात का असा सवाल केला आहे. तसेच जे वादग्रस्त विधान केलं आहे त्याबाबत माफी ही मागितली पाहिजे असं म्हटलं आहे.
महाजन यांच्या मागणी आणि टीकेवर मिटकरी यांनी उत्तर देताना, आधी संभाजीराजे यांचा इतिहास वाचा. ते स्वराज्य रक्षक होते आणि राहतील. त्यांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे. तर त्यांना धर्मविर म्हणून खुजेपणा कोणी आणू नये. तर आज जे अजित पवार यांचे पुतळे जाळत आहेत ते कुठे होती. जेंव्हा महात्मा फुले आणि कर्मवीरांचा अपमान झाला.