संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर…
खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगला परिसराची रेकी करण्यात आल्याचा आरोप त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. प्रत्यक्षात हे प्रकरण वेगळेच निघाले आहे. तर भाजपाचे नेते मंत्री नितेश राऊत यांनी या प्रकरणाची खिल्ली उडविली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्याबाहेर अज्ञात मोटरसायकलस्वारांकडून रेकी झाल्याचा आरोप त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांना महाविकास आघाडीचे सरकार असताना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविली होती. आता त्यांची सुरक्षा कमी केल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संजय राऊत यांच्या बंगल्या बाहेर रेकी नव्हे तर मोबाईल नेटवर्क कंपनीचे कर्मचारी टेस्टींग करीत होते असे उघड झाले आहे. यावरुन भाजपाचे नेते मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत रेकी प्रकरणाची खिल्ली उडवत मच्छर मारायला कोण रेकी करणार आहे. आम्ही हवे तर गुड नाईटची कॉईल लावू डास-मच्छर निघून जातील असेही राणे यावेळी मीडियाशी बोलताना म्हणाले.
Published on: Dec 21, 2024 02:31 PM