Pune crime : सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट! भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा

| Updated on: Aug 30, 2022 | 10:04 AM

Atul Bhatkhalkar on Sonia Gandhi : संदीप भुजबळ यांनी अतुल भातखळकर यांच्याविरोधात तक्रार दिली होती. ट्वीटरवरुन अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत पोस्ट केली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीकाही केली होती.

पुणे : भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP Mla Atul Bhatkhalkar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याबाबत अतुल भातखळकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेखी तक्रारीनंतर पुणे सायबर पोलिसांनी (Pune cyber Police) अखेर अतुल भातखळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अतुल भातखळकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय. संदीप भुजबळ यांनी अतुल भातखळकर यांच्याविरोधात तक्रार दिली होती. ट्वीटरवरुन अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत पोस्ट केली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीकाही केली होती. आता अतुल भातखळकर यांच्या पोलिसांकडून या पोस्टप्रकरणी चौकशीही केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Published on: Aug 30, 2022 10:04 AM
Sandipan Bhumare : संदीपान भुमरे औरंगाबादचे पालकमंत्री होणार-सूत्र, जालन्याचेही पालकमंत्री ठरले!
सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल