‘जरांगेंच्या आजच्या आरोपांनी त्यांचा खरा…,’ काय म्हणाले भातखळकर

| Updated on: Feb 25, 2024 | 6:27 PM

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांची फलटण त्यांच्या बचावाच्या कामाला लागली आहे. भाजपाचे झाडून सारे नेते टीव्हीवर प्रतिक्रीया देत आहेत. आमदार अतुल भातखळकर यांनी जरांगेचे आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेले देवेंद्र फडणवीस यांच्या 13 कोटीचा जनतेचा विश्वास आहे. त्यांनी दिलेले आरक्षण हायकोर्टात टीकले. परंतू उद्धव ठाकरे आणि पवार यांच्या सरकारने सुप्रिम कोर्टात वकील न दिल्याने ते फेटाळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथील उपोषणाचा 16 वा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधात गेले काही दिवस अजय महाराज बारसकर आणि संगिता वानखेडे यांनी आरोप केल्यानंतर जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. आपल्याला सलाईनमधून विष देऊन किंवा एन्काऊंटर करुन मारण्याचा फडणवीस यांचे स्वप्न असल्याचा सनसनाटी आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यानंतर ते सागर बंगला या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानाकडे निघाले आहेत. माझे वाटेत बरेवाईट काही झाले तर माझे प्रेत तेथ न्या असेही जरांगे यांनी म्हटले आहे. भाजपाचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी जरांगे यांनी आता राजकारणात यावे असे म्हटले आहे. जरांगे यांचे आरोप हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणारे पहिले नेते आहेत. त्यांनी मराठा तरुणांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. फडणवीस बावणकशी सोनं आहेत, हे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला माहीती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जरांगेंच्या आजच्या आरोपांनी त्यांचा खरा हेतू काय आहे हे आज कळालं. त्यांनी मराठा तरुणांचे नुकसान करु नये, जरांगेंच्या आरोपांनी फडणवीस यांच्या प्रतिमेवर काही परीणाम होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 25, 2024 06:23 PM
WITT Global Summit : मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’मुळे भारत विकसित होणार, अभय भुतडा यांना विश्वास
WITT Global Summit : खेलो इंडियाची जादू ऑलिम्पिकमध्ये अन् भारतच वर्चस्व गाजवणार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा विश्वास