Gopichand Padalkar : ‘जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..’, गोपीचंद पडळकरांची टीका

| Updated on: Mar 23, 2025 | 12:40 PM

Gopichand Padalkar On Jayant Patil : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. जयंतराव हे घरघर लागलेला माणूस आहे, असं यावेळी त्यांनी म्हंटलं.

जयंत पाटील हा काही लढावू माणूस नाही. वडिलांच्या रिक्त जागी आल्यामुळे संघर्ष आणि जयंत पाटील यांचा संबंध नाही. जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटीचं मला काही विशेष वाटत नाही, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. पाटील आता पूर्णपणे शरण आले आहेत हे लोकांनाही कळलं आहे. पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्तेसाठी लाचार होण्याची त्यांची तयारी आहे, अशी खोचक टीका देखील पडळकर यांनी केली आहे.

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी चाळीस हजार मतांनी निवडून आलो जयंत पाटील फक्त अकरा हजार मतांनी निवडून आले. आता ती ताकद राहिली नाही. जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस असल्याचे ते म्हणाले. जयंतराव हा किरकोळ माणूस आहे. त्यांना आता घरघर लागली आहे. त्यांचा आता कुठेही प्रभावी गट राहिला नाही. त्यांची इस्लामपूरपुरती ताकद मर्यादित राहिली आहे, असंही यावेळी पडळकर यांनी म्हंटलं आहे.

Published on: Mar 23, 2025 12:40 PM
Satish Bhosale : खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
Raj Thackeray : राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले ‘हे’ मोठे बदल