VIDEO | ‘खडसे एक विकृती, नको त्या भानगडी लावल्या’; भाजप आमदाराची खरमरीत टीका

| Updated on: May 29, 2023 | 10:51 AM

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आम्ही तुमचा खरा इतिहास बाहेर काढू असा इशारा देत टिका केली आहे. तसेच तर खडसे म्हणजे विकृती आहे. मात्र वयाने मोठे असूनही त्यांना राजकारणात एक चांगला आदर्श पायंडा घालता आला नाही.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आम्ही तुमचा खरा इतिहास बाहेर काढू असा इशारा देत टिका केली आहे. तसेच तर खडसे म्हणजे विकृती आहे. मात्र वयाने मोठे असूनही त्यांना राजकारणात एक चांगला आदर्श पायंडा घालता आला नाही. गिरीश महाजन असतील, दुसरे पालकमंत्री असतील, ते जे काम करताहेत. विकास कामांना सोडून उगीच दुसरीकडे भरकवटायचं काम खडसे करत आहेत. तर खडसे हे एक विकृती आहे. या माणसाने आयुष्यात काहीही चांगलं केलं नाही. नको त्या भानगडी लावल्या. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एव्हढी धुसमूस आहे की, राष्ट्रवादी खडसे नसते तर चांगल्या परिस्थितीत होती. कपाळकरंटं माणूस कसं असतं, तसा आहे माणूस आहे. राष्ट्रवादीला पनवती आहे. तिथं गेले आणि पूर्ण राष्ट्रवादीचा सत्यानाश करत आहे. बरं झालं तिकडे गेले.

Published on: May 29, 2023 10:51 AM
“मुख्यमंत्री शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाची कावीळ, एवढीच हिंमत असेल तर…”, ठाकरे गटाचं आव्हान
लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्रच होणार? निवडणूक आयोगाची लगबग