नितेश राणे यांचे पुण्यात वादग्रस्त विधान, ‘घोडा हत्याराची भाषा नाही आम्ही थेट…’
मोदी, शाह, फडणवीस हे सगळे आमचे आहेत. आपल्यावर आता कोणी गुन्हा दाखल करणार नाही. आपलं सगळं आहे देश राज्य, त्यामुळे पोलिसांना सांगा उगाच गुन्हे दाखल करू नका. आपला बॉस सागर बंगल्यावर बसले आहेत. तुम्हाला काही होणार नाही असे नितेश राणे म्हणाले.
पुणे : 4 सप्टेंबर 2023 | भाजप आमदार नितेश राणे यांनी पुण्यामध्ये एक वादग्रस्त विधान केलंय. पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमणाविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला ४८ तासांमध्ये अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटम दिला आहे. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. त्यावेळी आमदार राणे यांनी हे वादग्रस्त विधान केले. सर्वधर्मसमभावाचा ठेका फक्त हिंदूंनी घेतला नाही. हे हिंदूराष्ट्र आहे त्यामुळे आधी हिंदूचे हित बघितले जाईल मग इतरांना बघितले जाईल असा इशारा त्यांनी दिला. आपण घोडा हत्याराची भाषा करणार नाही आम्ही थेट कापतो, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.
Published on: Sep 04, 2023 06:13 PM