VIDEO | ‘कधी तो शेवटचा अग्रलेख लिहायचा दिवस येईल हे कळणार ही नाही…, झाकणझुल्या’; भाजप नेत्याचा राऊत यांच्यावर टीकास्त्र
सामानातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज टीका करण्यात आली आहे. त्यावरून सध्या जोरदार वार पलटवार होताना दिसत आहेत. याच टीकेवरून भाजप नेत्यांनी टीकेची झोड उडवली आहे.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आजच्या सामना अग्रलेखात टीका करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. तर यावरून आता भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार राम कदम आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी यावरून ट्विट करत शिवसेना ठाकरे गट, उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यावर निशाना साधत टीकास्त्र सोडलं आहे. याचमुद्द्यावर आता भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी देखील टीका केली आहे. यावेळी राणे यांनी, लवकरच “माजी” खासदार होणारे स्वतःच्या कायम स्वरुपी “माजी” मुख्यमंत्री राहणाऱ्या तुमच्या मालकाला पहिले सांभाळा असा घणाघात केला आहे. तर DINO च्या दोस्तानामुळे पेंग्विन कधी “माजी” मातोश्रीकर होईल हे लवकरच कळेल असा टोला अदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तर कधी तो शेवटचा अग्रलेख लिहायचा दिवस येईल हे कळणार ही नाही. मग अंधारात बसून जेलच्या भिंतीवर “माजी माजी माजी” लिहीत रडत बसायला लागेल, झाकणझुल्या, असं टीकास्त्र राणे यांनी राऊत यांच्यावर सोडलं आहे.