आधी निलेश राणे हद्दच केली आज नितेश राणे यांनी धमकी प्रकरणी प्रतिक्रिया दिली; म्हणाले, ‘त्यांच्या सुरक्षेची काळजी’

| Updated on: Jun 09, 2023 | 4:28 PM

ट्विटरच्या माध्यमातून ‘लवकरच तुमचा दाभोलकर होणार’ अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या प्रकारानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना ट्विटरच्या माध्यमातून ‘लवकरच तुमचा दाभोलकर होणार’ अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांच्याशी आमचा वैचारिक विरोध आहे. ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या आणि आमच्या भूमिका या नक्कीच वेगळ्या आहेत. मात्र या राज्यामध्ये कोणालाही त्रास होणार नाही. याची काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. हे उद्धव ठाकरेंचे सरकार किंवा महाविकास आघाडीचे सरकार नाही. आम्ही काही उद्धव ठाकरेसारखे घरी बसून राज्याचा कारभार चालवत नाही. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती सरकार घेत आहे.

Published on: Jun 09, 2023 04:28 PM
पवार यांना आलेल्या धमकीवरून मिटकरींवर कोणी केली टीका? म्हणाला, “ त्याच्यांपेक्षा कोणाचं”
एकीकडं मान्सूनची प्रतिक्षा तर दुसरीकडे ‘या’ राज्यातील १०२ गावांमध्ये पाण्याची टंचाई