‘मातोश्री’वर डायरेक्ट आरोप नाही! दंगली आणि राणेंच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक; फडणवीस यांच्याकडे करणार कोणती मागणी?

| Updated on: May 17, 2023 | 2:54 PM

त्यांनी 2004 च्या दंगलीमागील मास्टरमाईंड ठाकरे असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी याची सत्यता पडताळणीची मागणी करताना एयआयटीची मागणी केली आहे.

मुंबई : भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यांनी 2004 च्या दंगलीमागील मास्टरमाईंड ठाकरे असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी याची सत्यता पडताळणीची मागणी करताना एयआयटीची मागणी केली आहे. तसेच याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच ते म्हणाले, नितेश राणे यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. राज्यात ज्या दंगली झाल्या त्या मागे कुणाचा नेमका हात आहे? तर याला समर्थन सुद्धा हेच लोक देताना दिसतात. त्या बैठकिची पुनरावृत्ती होत आहे का? दंगलींचा पार्ट दू येत आहे का? हे सुद्धा तपासून पहायला हवं. तर अडीच वर्ष ज्याने सत्ता भोगली. त्यानंतरही फक्त सत्ता आणण्यासाठी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी असा प्रकार होत तर नाही ना हे पहावं लागेल. पण मला मातोश्रीवर डायरेक्ट आरोप करायचा परंतु सत्य बाहेर यायला हवं. त्यासाठीच गृहमंत्री यांना भेटणार आहे. तसेच एयआयटी चौकशीची मागणी देखिल करणार असल्याचे ते म्हणाले.

Published on: May 17, 2023 02:54 PM
‘जे. पी. नड्डा यांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करा’, ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून मोठा खुलासा, म्हणाले…