ज्यांनी शरद पवारांसोबत युती केली त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, प्रसाद लाड यांचा पेडणेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई : भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. किशोरी ताईंना मी हे सांगू इच्छितो की, आपल्याला विनंती आहे, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं हिंदुत्व सोडलं आणि दाऊतच्या मांडीवर बसलेल्या शरद पवार यांच्याबरोबर युती केली. काँग्रेसच्या पायावर डोक टेकवलं त्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असं लाड यांनी म्हटलं आहे. आता प्रसाद लाड यांच्या टीकेला ठाकरे गट आणि किशोरी पेडणेकर या काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावरू राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Published on: Oct 26, 2022 10:04 AM