प्रसाद लाड प्रकरणावर शंभुराज देसाई यांनी दिलं ‘हे’ उत्तर
खासगी तत्वावर कर्मचारी भरण्यासाठी नेमण्यात आलेल्या नऊ एजन्सीमधील “क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड” ही कंपनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची असल्याचे आरोप होत आहेत.
मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. याचदरम्यान खासगी तत्वावर कर्मचारी भरण्यासाठी नेमण्यात आलेल्या नऊ एजन्सीमधील “क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड” ही कंपनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची असल्याचे आरोप सूरज चव्हाण यांनी केले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना होण्याची शक्यता आहे. याचप्रकरणी शंभुराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली. देसाई यांनी, राज्यातील सध्याची संपाची स्थिती पाहता अरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. त्यामुळे लोकांना आरोग्य सुविधा, वैद्यकीय उपचार देण्यासाठी आऊटसोर्स घेण्याच्या तयारीत सरकार आहे. सामान्य जनतेसाठी ज्या उपाय योजना कराव्या लागतील त्या करण्याची तयारी सरकारची आहे. त्यामुळेच मुख्य सचिव यांना याबाबतीत सर्व सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. याबाबतीत जे काही निर्णय घ्यायचे ते मुख्य सचिव स्तरावर होत आहेत. यात कुठल्या पक्षाच्या कुठल्या गटाच्या कुठल्या व्यक्तीच्या कंपनीला कुठलं काम देण्याचा विषय नसल्याचेही शंभुराज देसाई म्हणाले.