भाजप आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर पुन्हा एकदा आगपाखड!
आता त्यावरनं सगळे कॉमेंट्स किंवा शिक्षक महोदयचे सांगतात असं म्हणतात की आम्हाला काही मुख्यालय राहण्याचं कंपल्शनच नाहीये. आम्ही राहणं न राहणं आम्हाला काहीतरी सूट दिलेली आहे.
औरंगाबाद – राज्यामध्ये शिक्षकांमध्ये(Teacher) एक वेगळ्या प्रकारचं वाचन म्हणा की त्यांचे मोर्चे म्हणा किंवा कुणाचे गैरसमजही झालेले असे मला वाटतं म्हणून मी आज आपल्याला माझी संपूर्ण बाजू शिक्षणाबाबतली सांगण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे. की मी शिक्षक महोदय संपूर्ण राज्यातील(state) त्यामध्ये 70% शिक्षक हे त्यांच्या मुख्यालय राहत नाहीत . हा त्यादिवशीचा माझा मुद्दा होता आणि तो एक गुणवत्ता ढासळण्याच अंग आहे. नुसतं तितकाच मुद्दा शिक्षणाची गुणवत्ता घासण्यासाठी आहे. असं माझं मत नाहीये. परंतु तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता त्यावरनं सगळे कॉमेंट्स किंवा शिक्षक महोदयचे सांगतात असं म्हणतात की आम्हाला काही मुख्यालय राहण्याचं कंपल्शनच नाहीये. आम्ही राहणं न राहणं आम्हाला काहीतरी सूट दिलेली आहे. एक एका बाबतीतलं त्यांचं मत आहे आता माझा त्याच्यामध्ये त्यांना विचारणा अशी आहे, समजा ते कुठेही राहून त्यांना जर त्यांचा घर भाडा भत्ता किंवा पगार मिळणार असेल किंवा काही प्रश्न नाहीये ते कुठे राहतात . अशी टीका भाजप आमदार प्रशांत बंब (BJP MLA Prashant Banmb) यांनी शिक्षकांवर केली आहे.