पाटलांचं वक्तव्य नव्हे तर भाजपचे…; मिटकरी यांचा राज्य सरकारवर टोला

| Updated on: Mar 17, 2023 | 12:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे रमेश पाटलांचे नाही तर भाजपचे बोल आहेत. जे सत्य परिस्थिती आहे त्याचेच कथन रमेश पाटील यांनी केलं

मुंबई : भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत निरमा वॉशिंग पावडरचं वक्तव्य करत राजकारण चांगलेच तापवलं आहे. त्यावर विरोधकांची टीका होत आहे. यावर उद्धव ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी निशाना साधत भाजपचे खरं रूप समोर आलं आहे. भाजप एकेक करून सर्व पक्षाचे नेते आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करतय, अशी टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे रमेश पाटलांचे नाही तर भाजपचे बोल आहेत. जे सत्य परिस्थिती आहे त्याचेच कथन रमेश पाटील यांनी केलं. आमच्याकडे गुजरातीचे निरमा वाशिंग पावडर आहे. या पवित्र पार्टी या. धुवून स्वच्छ व्हा. असे सांगून आमच्या पक्षात या याची ऑफर दाखवली जाते. राजन साळवी किंवा इतर अनेक आमदार असू द्या त्यांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Published on: Mar 17, 2023 12:00 PM
शेवटी त्यांनी ‘हे’ कबूल केलच; मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया
शिंदे सरकारकडून किसान सभेच्या मागण्या मान्य, तरीही किसान सभेचे नेते लाँग मार्चवर ठाम