वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाजपा आमदार रस्त्यावर

| Updated on: Apr 25, 2022 | 9:30 AM

नाशिकमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क आमदार वाहतूक पोलीस बनल्याचे पहायला मिळाले. औरंगाबाद रोड परिसरामध्ये तब्बल 2  तास वाहतूक कोडीं झाली होती. अखेर ट्रॅफिक जाम काढण्यासाठी भाजपा आमदार राहुल ढिकले हे स्वतः  मैदानात उतरले.

नाशिक : नाशिकमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क आमदार वाहतूक पोलीस बनल्याचे पहायला मिळाले. औरंगाबाद रोड परिसरामध्ये तब्बल 2  तास वाहतूक कोडीं झाली होती. अखेर ट्रॅफिक जाम काढण्यासाठी भाजपा आमदार राहुल ढिकले हे स्वतः  मैदानात उतरले, त्यांनी रोडवर जाऊन वाहतूक सुरळीत केल्याचे पहायला मिळाले. आमदार राहुल ढिकले यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हयरल होत असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

भंडाऱ्यात भाजपाचं विद्युत भारनियमनाविरोधात कंदील आंदोलन
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला?