‘पंकूताई…वाट वाकडी करुन…,’ काय म्हणाले सुरेश धस
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरणातून निर्घृण हत्या झाल्यानंतर विधीमंडळात त्याचे पडसाद उमटले. शनिवारी बीड येथे संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी मोर्चा निघाला आहे. या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी यावेळी भाषणात पंकजा मुंडे यांच्यावर शाब्दीक हल्ला केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यात तणाव पसरला आहे. या हत्येच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी बीड येथे विरोधकांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मोर्चात अनेकांची भाषणे होत आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात विधीमंडळात अनेक आरोप केले आहेत. आज सुरेश धस यांनी भाषणात मंत्री पंकजा मुंडे यांचा पंकू ताई असा उल्लेख केला आहे. सुरेश धस म्हणाले माझा सवाल आहे आमच्या पंकू ताईंना, संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टला उतरला. 12 तारखेला तुम्हाला जायचे होते. मला माहिती आहे की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीचा तो दिवस होता,तुम्हाला जायचे होते. पण तुम्ही पाय वाकडे करुन संतोषच्या घरी का नाही गेलात हो … धनभाऊ गोपीनाथजी यांचा आम्हालाही आदर आहे. गोपीनाथजींनी तेव्हा मटक्याचा खटका बसवला, मुंबई्चे गँगवॉर जर कोणी बंद केले ते गोपीनाथ मुंडे यांनी बंद केले असेही धस यांनी सांगितले.