‘काल शपथ विधी झाला त्यामुळे ते आमचा मित्र पक्ष…’; भाजप नेत्याच्या अजित पवार यांना शुभेच्छा
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला आहे. याचदरम्यान राज्यात एकीकडे राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून कुठं आनंद तर कुठं तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान भाजपचे नेते हे अजित पवार यांच्या भेटीसाठी बंगल्यावर जात आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. यामुळे मविआसह शरद पवार आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना चांगलाच धक्का बसला. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला आहे. याचदरम्यान राज्यात एकीकडे राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून कुठं आनंद तर कुठं तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान भाजपचे नेते हे अजित पवार यांच्या भेटीसाठी बंगल्यावर जात आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना, अजितदादा हे आमच्या सोबत आले आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो असे ते म्हणाले. तर विकासाचा मुद्दा लक्षात घेता ते आमच्या सोबत आल्याचंही ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीच्या या फूटीवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांनी जबाबदार ठरवत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आमच्यासोबत आली त्याचा आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर चार दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानावर बोलताना आपली तेवढी लायकी नसल्याचंही ते म्हणाले.