Mohit Kamboj | ‘नवाब मलिक आणि संजय राऊत बनु नका’ मोहित कंबोज- TV9

| Updated on: Aug 28, 2022 | 1:31 PM

मोहित कंबोज यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर निशाणा साधताना रोहित पवार यांना टार्गेट केलं आहे. त्यांनी याच्या आधी देखिल दोन ट्विट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये मोहित कंबोज यांनी रोहित पवार यांना नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका असं म्हटलेलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते मोहित कंबोज हे वेगवेगळे ट्विट करून चर्चेत राहत आहेत. पावसाळी अधिवेशनात मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा एक बडा नेता आता तुरुंगात जाईल अशा पद्धतीने ट्विट केलं होतं. त्यानंतर त्यांनी विद्याताई चव्हाण यांच्या नावे ही ट्विट केलेलं आहे. या दरम्यान मोहित कंबोज यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर निशाणा साधताना रोहित पवार यांना टार्गेट केलं आहे. त्यांनी याच्या आधी देखिल दोन ट्विट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये मोहित कंबोज यांनी रोहित पवार यांना नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका असं म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीचा नवाब मलिक हा एक बोल बच्चन होता आणि याच बोल बच्चनची जागा भरण्याचं काम सुरू असल्याचाही टोला त्यांनी लगावला.

 

Published on: Aug 28, 2022 01:31 PM
Radhakrishana Vikhe Patil At Sangamner | संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना जंगी स्वागत – tv9
Shahajibapu Patil | ‘ज्यांची प्रवृत्ती राजकारणात खोक्यावर, तेच खोक्यावर बोलतात’- tv9