“बेडूक कितीही…” या अनिल बोंडे यांच्या टीकास्रावर भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?
याचदरम्यान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली. “बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही,” अशा शब्दांत अनिल बोंडेनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं.
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून लोकप्रियतेवरून शिंदे गट आणि भाजपच्या युतीत जोरदार वाद सुरू आहे. यावरून सध्या भाजपचे नेते आपली नाराजी उघडपणे मांडत आहेत. तर तयावर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण दिलं जात आहे. मात्र लोकप्रियतेचा मुद्दा हा भाजपच्या चांगल्याच जिव्हारी लागल्याचे पहायला मिळत आहे.
याचदरम्यान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली. “बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही,” अशा शब्दांत अनिल बोंडेनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं. बोंडे यांच्या टीकेवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचबरोबर याविषयी उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी कोणाला काय बोलायचं ते बोलले आहेत. त्यामुळे आम्ही यावर बोलणार नाही. पण “बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल” असा इशाराच त्यांनी दिला आहे.