मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांना अयोध्येच्या एअरपोर्टवरही उतरु देणार नाही- brij bhushan singh

| Updated on: May 08, 2022 | 9:50 AM

राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी एअरपोर्टवरही उतरु देणार नाही असं भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे

मुंबई : मशिदीवरील भोंगे (Bhonge on mosque), हनुमान चालिसा, हिंदुत्व अशा मुद्द्यांवरुन राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून आणि उत्तर सभेतून याच मुद्द्यांवर भर दिला. तसंच मशिदीवरील भोंगे हटविण्यासंबंधी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. तसेच त्यांनी आपला आयोध्याचा दौरा ही जाहीर केला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण (BJP MP Brijbhushan) यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून अनेक वेळा उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. त्यांनी अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतरच अयोध्येत पाऊल ठेवावं, जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी उघड धमकीच ब्रिजभूषण यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे, ” “राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी एअरपोर्टवरही उतरु देणार नाही. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी सल्ला देऊ शकत नाही, पण लोकांच्या भावना लक्षात घेता मी त्यांना विनंती केली आहे की, जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका”

Published on: May 08, 2022 09:49 AM
Pune Vasant More On Hanuman Mahaarti | मनसेच्या पार्टटाईम पदाधिकाऱ्यांना माझं वेगळेपण खटकतं
Pune Vasant More On Hanuman Mahaarti | कात्रजमधील हनुमानाच्या महाआरतीला मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर; वसंत मोरे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली