Special Report | बृजभूषण सिंह फडणवीसांचंही ऐकणार नाहीत?
कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आता राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करण्यापूर्वी उत्तरभारतीयांची माफी मागावी असे म्हटले आहे. एवढंच नव्हेत रराज ठाकरे यांना रोखण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या असून, त्यासाठी संपूर्ण राज्यात पोस्टर लावत, रॅलीही काढल्या जात आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आता राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करण्यापूर्वी उत्तरभारतीयांची माफी मागावी असे म्हटले आहे. एवढंच नव्हेत राज ठाकरे यांना रोखण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या असून, त्यासाठी संपूर्ण राज्यात पोस्टर लावत, रॅलीही काढल्या जात आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी याबाबत ठिकठिकाणी पोस्टर लावली असून , “उत्तर भारतीयांना गुन्हेगार म्हणणारे राज ठाकरे माफी मागा नाहीतर परत जा. असे त्यात लिहिले आहे. जय श्रीरामच्या घोषणा देत, नेताजी आगे बढो हम तुम्हारे साथ है. यासारख्या घोषणा देत हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. एवढंच नव्हेतर स्थानिक लोकांकडूनही त्यांना पाठींबा मिळत आहे.