पवार यांना आलेल्या धमकीवरून मिटकरींवर कोणी केली टीका? म्हणाला, “ त्याच्यांपेक्षा कोणाचं”

| Updated on: Jun 09, 2023 | 3:57 PM

राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी आणि यांनी भाजपवर टीका केली होती. तसेच भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. तसेच मुनगंटीवार, पडळकर, आणि निलेश राणे यांच्या चौकशीची मागणी केली होती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकारानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी आणि यांनी भाजपवर टीका केली होती. तसेच भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. तसेच मुनगंटीवार, पडळकर, आणि निलेश राणे यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावरून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी मुनगंटीवार, पडळकर आणि निलेश राणे यांच्या चौकशीच्या आधी मिटकरांची चौकशी झाली पाहिजे, कारण त्यांच्याएवढी प्रक्षोभक व्यक्तव्य कोणी केली नसतील. सत्तेविना हे सर्वजण तडफडत आहेत, अशीही टीका महाडिक यांनी केली आहे.

Published on: Jun 09, 2023 03:57 PM
Weather Change : केरळमध्ये मान्सून दाखल अन् नागपूरात ढगाळ वातावरण
Wrestlers Protest | कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाला वेगळं वळण, काय घेतली नवी भूमिका