आव्हान सारखे बुद्धिभेद करणारे शब्द त्यांना वापरू द्या; उदयनराजेंचा अजित पवारांवर पलटवार
उदयनराजे यांनी, जो-तो पक्ष वाढीसाठी बोलत असतो. पण मी असल्या कोणत्याही आव्हानांना भीक घालत नाही. कोणती आव्हानं स्वीकारायची आणि कोणती नाही, हे माझं मी ठरवतो. तर अजित पवार यांनी सातारा लोकसभेची निवडणूक शरद पवार यांनी लढवावी असे मत व्यक्त केलं होतं
सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. अजित पवार यांनी, साताऱ्याचा पुढचा खासदार व जावळीचा आमदार हा राष्ट्रवादीचा असेल, असे वक्तव्य केले होते. यावरून उदयनराजे यांनी, जो-तो पक्ष वाढीसाठी बोलत असतो. पण मी असल्या कोणत्याही आव्हानांना भीक घालत नाही. कोणती आव्हानं स्वीकारायची आणि कोणती नाही, हे माझं मी ठरवतो. तर अजित पवार यांनी सातारा लोकसभेची निवडणूक शरद पवार यांनी लढवावी असे मत व्यक्त केलं होतं. पण कदाचित त्यांनाच भविष्यात इथून उभं राहायचं असावं. कारण त्यांचे साताऱ्यात दौरे वाढले आहेत. तर आव्हान सारखे बुद्धिभेद करणारे शब्द त्यांना वापरू द्या, बाकी पुढे बघू काय करायचे ते असेही उदयनराजे म्हणाले.
Published on: Apr 10, 2023 03:58 PM