भाजप नेत्याचा विश्वास 2024 ला पीएम हा भाजपचाच आणि मोदीच होणार

| Updated on: Apr 23, 2023 | 7:46 AM

जसे या राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस झाले तसेच 2024 ला या देशाचे पंतप्रधान हा भाजपचाच होईल. तर ते दुसरे तिसरे कोणी नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच हेच असतील, असेही दानवे म्हणाले

मुंबई : भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांच्या वक्तव्यामुळे बरेचदा चर्चेत असतात. त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ‘ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्यांनी, जसे या राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस झाले तसेच 2024 ला या देशाचे पंतप्रधान हा भाजपचाच होईल. तर ते दुसरे तिसरे कोणी नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच हेच असतील, असेही दानवे म्हणाले. यावेळी ते म्हणाले, मी त्यावेळी, केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. तर जसे फडणवीस उपमुख्यमत्री झाले तसेच देशाचे पंरप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होतील. तर ते पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा तुम्ही मला बोलवा आणि मग या सगळ्याचा फैसला करू असेही दानवे म्हणाले.

 

Published on: Apr 23, 2023 07:46 AM
Special Report | मुख्यमंत्रिपदाची इच्छा अन् अजित पवार यांना भाजपची ऑफर?
मध्यरात्री काळाचा घाला, कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात; चौघे ठार तर…