राऊत त्यांचा पक्ष सोडणार? दुसऱ्या पक्षात जाणार? कोणाचा दावा? अजित पवारांच नाव ही घेतल! कारण काय?
राजकारणात आणखी एक भूकंप होणार. येत्या आठवड्यात हा भूकंप होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिला नसल्यानं आता संजय राऊत हे देखील त्यांचा साथ सोडतील.
मुंबई : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात बारसू रिफायनरीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याचदरम्यान राणे यांनी राऊतांबाबत खळबळजनक दावा केला आहे. राजकारणात आणखी एक भूकंप होणार. येत्या आठवड्यात हा भूकंप होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिला नसल्यानं आता संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील त्यांचा साथ सोडतील. तर ते शरद पवारांचा (Sharad Pawar) हात धरतील. ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. तसेच याबाबत पवार आणि राऊत यांच्यात बैठका झाल्याचा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. तर राऊत यांची पक्षप्रवेसाची अट देखील त्यांनी सांगितली. राऊत यांनी, ज्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडतील त्यादिवशी ते राष्ट्रवादीत प्रवेश करतो अशी अट घातल्याचा दावा केला आहे. तर राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा 10 जूनपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असंही त्यांनी म्हटलं आहे. नीतेश राणेंच्या या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.