चंद्रपुरातील राजुरा शहर हादरले; अंदाधुंद गोळीबार, भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

| Updated on: Jul 24, 2023 | 7:15 AM

ही घटना रविवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास घडली असून अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. तर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर, 24 जुलै 2023 | चंद्रपुरातील राजुरा शहर हादरले असून येथे पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. ज्यामुळे लोकांच्या मनात भीती पसरली आहे. ही घटना रविवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास घडली असून अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. तर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पूर्वशा सचिन डोहे (वय 27) असं मृत्युमुखी पडलेल्या भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीचं नाव आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे. तर पोलिस शोध घेत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील सोमनाथपुर वार्डात रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी सचिन डोहे यांचे घरासमोरून केला गोळोबार. गोळीबाराचा आवाज आल्याने पूर्वशा बाहेर आल्या. ज्यात सचिन यांची पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या गेल्या. ज्यातील एक गोळी थेट छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर लल्ली नामक व्यक्ती जखमी झाला. त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असू परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Published on: Jul 24, 2023 07:11 AM
अखेर अण्णा हजारे बोलले; पण त्यावरही राऊत यांचा टोला, म्हणाले, ‘मागणीनंतर अण्णांनी थेट…’
“मग मी हॉटेलवर आलो आणि कळलं…”, टोलनाक्यावर नेमकं काय घडलं? अमित ठाकरे यांनी सांगितला घटनाक्रम